ई–कॉमर्स ….. ही माझ्या व्यवसाय वाढण्याची संधी आहे का ?
ई–कॉमर्स ही संकल्पना सध्या ग्राहकांच्या मनावर ठासून भरली आहे. कोणतीही सेवा किंवा वस्तू घ्यायची असल्यास ऑनलाईन मिळेल असे आपण सर्वत्र ऐकतो. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, झोमॅटो, ओला, ह्या कंपन्यांनी ई कॉमर्स घराघरात पोहचवले. जिथे सर्व वस्तू किंवा सेवा ऑनलाईन मिळविता येतात. त्याचे पैसे सुध्या ऑनलाईनच भरावे लागते. ग्राहकाला मात्र कुठेही न जाता घरबसल्या सर्व गोष्टी मिळविता येतात. आणि विक्रेत्याला सुध्या कुठे न जाता ऑनलाईन ऑर्डर्स मिळतात. विक्रेत्याला आता ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कुठे दुकान किंवा शोरूम उभे करायची गरज नाही. अश्या ह्या ई कॉमर्स चा मी माझ्या व्यवसायात उपयोग करू शकतो का ?? हो नक्कीच करायलाच हवा, कारण ती ग्राहकांची गरज आहे आता. पण त्या करिता ई कॉमर्स म्हणजे काय आणि त्याच उपयोग मला माझ्या व्यवसायात कसा करून घेता येईल.
इ कॉमर्स म्हणजे काय ?
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इंटरनेट कॉमर्स म्हणून ओळखल्या जाणार्या ईकॉमर्सचा अर्थ इंटरनेटद्वारे माल किंवा सेवा खरेदी आणि विक्री करणे. आणि असे व्यवहार करण्यासाठी पैसे आणि डेटा एक्सचेंजकरणे. ईकॉमर्स विविध प्रकारच्या फॉर्ममध्ये व्यवसाय आणि ग्राहकांमधील भिन्न ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप आणि या व्यवहाराचा भाग म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची देवाणघेवाण करणारी विविध फॉर्म घेऊ शकते. ई कॉमर्स व्यवसायात चार मुख्य विभाग व्यवसाय ते व्यवसाय(बी 2 बी), व्यवसाय–ते–ग्राहक (बी 2 सी), ग्राहक–ते–व्यवसाय (सी 2 बी), ग्राहक–ते–ग्राहक (सी 2 सी) असतात. ह्याचा अर्थ , मी एखादी सेवा आणि माल एखाद्या ऑनलाईन साईट वर ऑर्डर करणार आणि त्याचे पैसे ऑनलाइनच पाठवणार आणि ती सेवा अगर वस्तू / माल मला घरपोच मिळणार. ऑनलाईन फूड ऑर्डर असो, ट्रीवागो सारख्या वेब साईट वरून हॉटेल बुकिंग असो किंवा फ्लिपकार्ट वरून मोबाईल ऑर्डर करणे असो. ग्राहक म्हणून मी जर ह्याचा उपयोग घेऊ शकतो तर विक्रेता किंवा व्यासायिक म्हणून का करू नये.
हे कसे करावे .
मूलतः ई कॉमर्सचे तीन भाग पडतात माल / वस्तू / सेवांची माहिती , ऑर्डर व्यवस्थापन , पेमेंट.
स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट तयार करणे हे थोडे खर्चिक आहे. त्यामुळे आपण ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा वापर करून सुद्धा करू शकतो. जसे माल / वस्तू / सेवांची माहिती आपण social मीडियातुन लोकांपरेंत पोहचवू शकतो. आपल्या व्यवसायासाठी social मीडिया चा वापर करा. फेसबुक linkedIN इंस्टाग्राम ह्या सारख्या माध्यमांचा आपल्या सेवेची अथवा मालाची जाहिरात करण्यास सुरु करा. त्याशिवाय सध्या सुरु असलेल्या वेब साईटवर आपण विक्रेता म्हणून नोंदणी करा. त्यात आपले मालाचे किंवा सेवेचे सविस्तर वर्णन द्या. . गूगल वर “My Business Place” ला रजिस्टर करा. QR कोड तयार करा आणि सर्व ठिकाणी माध्यमांवर प्रसारित करा. indiamart , Justdial ह्या सारख्या पोर्टल्स वर रजिस्टर करा आणि आपली ई कॉमर्स वेब साईट ची लिंक द्या.
ऑर्डर व्यवस्थापनेसाठी आपण फोन, ई-मेल, किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअर सुध्या आहेत (फुक्कट किंवा अगदी वाजवी किमतीत उपलब्ध आहेत).
पेमेंट जाहिराती सोबतच सोबत पेमेंट वॉलेट लिंक द्या जेणे करून ग्राहकांसाठी पेमेंट करणे सोईस्कर होईल. M -wallet , नेट बँकिंग , मोबाईल बँकिंग ह्या सर्व चा उपयोग करा. पेमेंटच्या / मालाच्या / सेवेच्या नव्या नव्या योजना तयार करा आणि social मीडिया वर प्रसारित करा.
ह्याचे फायदे काय??
१. व्यावसायिकाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जागतिक बाजार पेठेत प्रवेश करता येतो. ह्याला भौगोलिक सीमा आणि आव्हाने नाहीत. ही प्रक्रिया विक्रेत्यांना जागतिक प्रेक्षकांना विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांना जागतिक निवड करण्यासाठी सक्षम करते.
२. थेट अंतिम ग्राहकांसोबत संवाद. ही प्रक्रिया विक्रेत्यांना ग्राहकांच्या जवळ येण्यास सक्षम करते ज्यामुळे उत्पादनक्षमता आणि परिपूर्ण स्पर्धा वाढते.
३. ईकॉमर्स व्यवसाय हा एकमेव ठिकाण आहे जो आपल्याला झोपताना देखील कमावतो. हे दिवसात २४ तास कोणत्याही अडथळ्यांशिवाय कार्य करते जेणेकरून आपण आपला व्यवसाय चालू करता आणि आपण कमाई करता. जलद व्यवहार आणि २४*७ उपलब्धता.
४. ग्राहकांसाठी, दुकानात जाणे , रांगेत उभे राहणे , कॅश पेमेंट करणे ह्यापेक्षा एका जागेरून ऑर्डर देणे सोईस्कर आहे म्हणून ग्राहक ह्या कडे आकर्षित होतो.
४. ईकॉमर्स व्यवसाय जगभरात केला आहे यामुळे आपल्या कंपनीची सद्भावना वाढविण्यात आणि आपल्याला अधिक नफा मिळविण्यात देखील मदत होईल.
ईकॉमर्स व्यवसायासाठी आपल्याला फक्त एक होस्टिंग सोल्यूशन आवश्यक आहे, जो आपल्याला काही क्षणांमध्ये साइन अप करेल. आपल्या होस्टिंग समाधानासह साइन अप केल्यानंतर आपण सहजपणे इंटरनेटवर आपले उत्पादन विकू शकता. इंटरनेट आणि इ कॉमर्स ही साधने व्यावसायिकाला त्याच्या ध्येयापरेंत पोहचविण्यास नेहमी तयार असतात . त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून व्यवसाय समृद्ध व्हावे. आपण एक सज्ञान व्यावसायिक असल्यास, आपल्या सर्व साम्राज्याला वाढविण्याची संधी म्हणून या सर्व फायद्यांना पाहण्यासाठी दीर्घकाळ लागणार नाही.
मयूर देशपांडे
व्यवसाय विश्लेषक
पुणे ४११०१४