व्यवसाय विश्लेषण पेक्षाही महत्वाचे असे स्व- विशलेषण !!
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा सुरु असताना आपण व्यासायिक विशलेषण करतोच. उद्योग, त्याची प्रक्रिया, मोबदला, खर्च, आणि बरेच काही. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करतो. पण बऱ्याच वेळेस ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास उत्तम करून सुद्द्धा आपणस व्यवसायात हवे तसे यश मिळत नाही. ह्याचे बरेचसे कारण असू शकतात. एक महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय आणि व्यावसायिकाची सुसंगती आणि वैचारिक मेळ. जेंव्हा व्यवसाय आणि व्यावसायिक एक होतो त्यावेळी व्यवसाय हीच त्याची ओळख असते. हीच ओळख निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो. हीच एकता, सुसंगती, मेळ व्यवसायाला आणण्यासाठी आपल्याला एकदा तरी स्व विशलेषण करणे क्रमप्राप्त आहे.
स्व विश्लेषण करणे म्हणजे काय ? आपल्या वयक्तिक गोष्टींचा प्रभाव आपल्या व्यवसायावर होत असतो. अश्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे, त्यातील चांगल्या गोष्टीचा सकारात्मक प्रभाव कसा पडेल. आणि वाईट गोष्टीचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करता येईल ह्याचा अभ्यास आणि व्यवस्थापन. अश्या किती आणि कोणत्या गोष्टीचा प्रभाव आपल्या व्यवसायावर होतो ह्याचा अभ्यास करणे. उदा .
भावना : खूप भावना प्रधान असणे व्यवसायासाठी चांगले नाही असे जुने लोक सांगतात. प्रॅक्टिकल विचार करावा. हे सर्व सत्य असेलही पण आपल्या भावनांचा सकारात्मक प्रभाव आपल्या व्यवसायावर कसा करता येईल. भावना जसे राग, आनंद, भीती आणि सर्व भावनांचा एक व्यावसायिक घटक म्हणून उपयोग करता येईल का ? व्यवसाय प्रक्रियेतील कोणती गोष्ट आपल्याला आनंद देणारी आहे. कोणत्या गोष्टीची भीती जास्त आहे, त्यावरील उपाय काय? कोणत्या गोष्टीचा राग येतो ती गोष्ट आपण कशी दूर ठेऊ शकतो. ह्याचे विश्लेषण अपेक्षित आहे. लिखाण ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. ह्याचा मी व्यवसायात खूप उपयोग करतो. ह्यांनी मी आनंदी अनादी राहण्यास मदत होते आणि व्यवसायात सुद्धा मदत होते.
नैतिक मूल्ये : मानवी जीवनाचा सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे नैतिक मूल्ये. माझ्या मते आपला व्यवसाय आपली वस्तू किंवा सेवा चालवत नाही तर आपले मूल्ये आपला व्यवसाय चालवत असतो. म्हणून व्यवसायात त्याला अनन्य साधारण महत्व आहे. आपला प्रामाणिकपणा, निश्चय, प्रेम, निष्ठा ह्याच आपल्या व्यवसायाचा पाय आहे मग ह्याच अभ्यास करायला नको का? हातात घेतलेल्या कामाबद्दल आपण निश्चयी आहोत का?? ग्राहकाच्या वाचनबद्धतेबद्दल आपण निष्ठावान आहोत कि नाही? व्यवसायात दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी आपण प्रेमळ आहोत कि नाही? हे सर्व आपल्याला तपासून बघावेच लागेल. ह्या सर्व चांगल्या वाईट उत्तराचा आपल्या व्यवसायात कसा उपयोग केला जाऊ शकतो ते बघा.
शिक्षण आणि कौशल्य : ह्याचे तर विशलेषण करावेच लागेल. किंबहुना व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा सुरु असताना आपण ते केलेही असेलच. आपल्या कौशल्याचा सकारात्मक प्रभाव कसा करून घेता येईल ह्याच विचार करावा. कधी कधी ह्याच शून्य किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो का ते तपास. कौशल्य आधारित व्यवसाय आपल्याला कमी गुंतवणुकीत जास्त नफा देऊ शकतो. माझे टेक्निकल ज्ञान चांगले आहे. मी त्याच पुरेपूर उपयोग माझ्या व्यवसायासाठी करतो का? ह्याचे विश्लेषण करा.
प्रेरणा : व्यवसाय सुरु आणि मोठा करण्यासाठी आपल्याला कोणतीतरी प्रेरणा कार्यान्वित असते. आपली वैयक्तिक प्रेरणा काही. ती मला व्यवसायात उपयोगात अनंत येईल का? प्रत्येक वेळेला पैसे किंवा नफा हीच प्रेरणा असेल असे नाही. प्रशस्ती, अभ्यास किंवा आनंद ही सुद्धा प्रेरणा असू शकते. प्रत्येकाची काम करण्या मागची प्रेरणा वेगळी आहे. आपली कोणती आहे ते ओळख आणि त्याचा उपयोग व्यवसायात करा.
मयूर देशपांडे | ७७२१००५०५१
व्यवसाय विश्लेषक | पुणे
लेखक : मिरर्स ऑफ सेल्फ मॅनिफेस्टेशन